Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
7020777522
gpankalagi2022@gmail.com
PIN: 416412

भौगोलिक माहिती

स्थानिकता

अंकलगी हे गाव सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात येते. हे कर्नाटक सीमेलगत असून कर्नाटकातील विजापूर हे ऐतिहासिक ठिकाण अंकलगी पासून ४० किमी अंतरावर आहे.

भौगोलिक संरचना

अंकलगी समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

अंकलगी मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते. अंकलगी मध्ये एक पाझर तलाव व एक साठवण तलाव असून पाणी टंचाई काळात जत तालुक्याच्या पूर्वभागातील सुमारे ६० ते ६५ गावांना येथून टॅकरने पाणीपुरवठा केलाजातो. अंकलगी साठवण तलाव हा महत्वाचा आहे.

कृषी

अंकलगी मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे. या मध्ये डाळींब, द्राक्षे ( Graps) तूर, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, भुईमुग, ड्रगन, आंबा, अशी प्रामुख्याने शेती पिके घेतली जात आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

अंकलगी च्या आजूबाजूला काळीकसदार सुपीक जमीन आहे. बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

संस्कृती आणि इतिहास

अंकलगी मध्ये ऐतिहासिक मल्लिकार्जुन मंदिर आहे. गावामध्ये माहे एप्रिलमध्ये मल्लिकार्जुन देवाची यात्रा भरवली जाते. व यात्रे दरम्यान गावातील स्थानिक कलाकार कन्नड भाषिक नाटक सादर केले जाते. व नवरात्री मध्ये सुद्धा स्थानिक कलाकार कन्नड भाषिक नाटक सादर करतात.